आत्मा करी ना करवी – संत निळोबाराय अभंग – 1528

आत्मा करी ना करवी । अलिप्तपणें वर्ते जीविं ॥१॥

साक्ष नव्हे ना असाक्ष । उपेक्षा करीना कैंपक्ष ॥२॥

जैसें गगनीं अभ्र गळें । गगन अलिप्त त्यावेगळें ॥३॥

निळा म्हणे सन्निधानें । लोह चाले चुंबक नेणें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.