संत निळोबाराय अभंग

असोनि अलिप्त सर्वसंगी – संत निळोबाराय अभंग – 1526

असोनि अलिप्त सर्वसंगी । आत्मा भोगी ना विरागी ॥१॥

ऐसें जाणती ते ज्ञानी । नित्यमुक्त त्रिभुवनीं ॥२॥

मी हें स्फुरे जेथूनियां । आत्मा परचि त्याहूनियां ॥३॥

निळा म्हणे मी हे वदती । मूर्ख देहातेंचि कल्पिती ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *