अवघें होऊनि कांहींचि नव्हे – संत निळोबाराय अभंग – 1525

अवघें होऊनि कांहींचि नव्हे । आपुल्या स्वाभावें आपण ॥१॥

तया नांव आत्मतत्व । शुध्द सत्व मायादी ॥२॥

ध्वनि बीज ओंकार रुप । तेंही स्वरुप ऐलाडी ॥३॥

निळा म्हणे जाणों जातां । जाणोनि नेणता वेद जेथें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.