उपरम झाला सर्वकाळ इंद्रियां – संत निळोबाराय अभंग – 1522

उपरम झाला सर्वकाळ इंद्रियां । स्वरुपीं विलया मन गेलें ॥१॥

ऐशिया स्वानंदे बुझाविलें चित्त । राहिली अचिंत वदनीं वाचा ॥२॥

अष्ट अविर्भाव डवरले अंगीं । प्राणी प्राणरंगीं निजवासें ॥३॥

त्रयबंध ठसा पडिला शरीरा । वृत्ति गेली घरा निजाचिया ॥४॥

निमोनियां गेलें शब्दाचें बोलणें । पवनचि प्राणें शोषियेला ॥५॥

निळा सुखासुखीं पावला विश्रांती । पद पिंडा समाप्ति करुनियां ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.