विश्व अवघें मायाभास – संत निळोबाराय अभंग – 1519

विश्व अवघें मायाभास । माया ब्रहमीं नाहींची मोस ॥१॥

जेविं वन्हि सूर्यकांतीं । प्रगटतां कीर्ण त्या नेणति ॥२॥

शुक्तिका प्रसवें मुक्ताफळ । जळींचें परि त्या नेणेचि जळ ॥३॥

निळा म्हणे धूम्री वन्हीं । नाहींचि तयातें प्रसवोनी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.