देव प्रगटचि लपला – संत निळोबाराय अभंग – 1518

देव प्रगटचि लपला । आड आपण बैसला ॥१॥

काय नवल सांगो कैसें । सूर्य झांकिला प्रकाशें ॥२॥

निज ज्वाळें वैश्वानर । लह्या लोपिला सागर ॥३॥

निळा म्हणे धुळी । आड ठेली महीतळीं ॥३॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.