संत निळोबाराय अभंग

प्रवृत्तिनिवृत्तीचे आटुनिया भाग – संत निळोबाराय अभंग – 1515

प्रवृत्तिनिवृत्तीचे आटुनिया भाग । उतरिलें चांग रसायण ॥१॥

ज्ञानाग्रीहुतासी कडशिलें वोजा । आत्मसिध्दीकाजा लागोनियां ॥२॥

ब्रम्हरस ब्रहमीं सिध्द झाला पाक । घेतला रुचक प्रतितीमुखीं ॥३॥

स्वानुभवें अंगीं झाला समरस । साधननिजध्यास ग्रासोग्रासीं ॥४॥

आरोगयता निळा पावला आष्टांगीं । मिरवला रंगीं निजात्मरंगें ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *