घंडु जातां अळकांर – संत निळोबाराय अभंग – 1499

घंडु जातां अळकांर । होती अवघेचि श्रुंगार ॥१॥

नलगे उजळाही देणें । शोभती अंगीच्या बरवेंपणें ॥२॥

आंतु बाहेरी सारिखें । न ये हीनपणा बीकें ॥३॥

निळा म्हणे सुधा माल । हातीं लागला सुढाळ ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.