कोठेंचि हा नसे कोठेंही न दिसे – संत निळोबाराय अभंग – 1495

कोठेंचि हा नसे कोठेंही न दिसे । कोठेंचि अमुकासे न म्हणे कोणी ॥१॥

कोठें याचें होणें कोठें याचें निमणें । कोठूनि येणें जाणें न तर्केचि ॥२॥

कोठें याची स्थिति कोठें याची प्रीति । कोठें याची वसती न कळे कोणा ॥३॥

कोठूनि याचें कूळ । वर्णावयास आढळ न कळे गोत्र ॥४॥

निळा म्हणे याती न दिसे रुपाकृती । नयेचि कोणे व्यक्ती विचार करितां ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.