कांहींच न होऊनि विस्तारला – संत निळोबाराय अभंग – 1489

कांहींच न होऊनि विस्तारला । बहुरुपी हा एकला ॥१॥

नवल विचित्र हेंचि वाटे । कैसा नेटोनि ठेला नटें ॥२॥

एका ऐसा न होऊनि एक । नानाकोंरे हा अनेक ॥३॥

निळा म्हणे नट लाघवी । शेखीं वेगळा गोसावी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.