मज तों सांभाळिलें संती – संत निळोबाराय अभंग – 1476

मज तों सांभाळिलें संती । धरिलें हातीं दीन म्हणुनी ॥१॥

सांगतां नये विश्वास लोकां । बाधी अशंका ज्याची त्या ॥२॥

मी तों बोलें त्याचिया सत्ता । पुढें विचारितां कळेल ॥३॥

निळा म्हणे जुनाट नाणें । नव्हे हें उणें पारखितां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.