भाग्याची उजरी – संत निळोबाराय अभंग – 1473

भाग्याची उजरी । दिसे यावरी वोडवली ॥१॥

म्हणोनियां कृपावंत । झाले संत मायबाप ॥२॥

पाचारुनी देत मोहें । प्रेमपेहे पाजिती ॥३॥

निळा म्हणे सांगती कानीं । माझें मजलागुनी स्वहित ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.