संत निळोबाराय अभंग

ब्रम्हानंद मुसावला – संत निळोबाराय अभंग – 1471

ब्रम्हानंद मुसावला । अंगी बाणला आविर्भावो ॥१॥

संतवचनामृतें तृप्ति । झाली विश्रांति इंद्रियां ॥२॥

मन बैसलें ऐक्यासनीं । निश्चळ आसनीं सुखाचिये ॥३॥

निळा म्हणे लाभ ऐसा । जोडे सरिसा संतसंगे ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *