परम सुखाचा सुकाळ – संत निळोबाराय अभंग – 1468

परम सुखाचा सुकाळ । चित्तीं वसे सर्वही काळ ॥१॥

ऐसें केले कृपादान । तुम्हीं मनातें मोहुन ॥२॥

जिवा पैलाडिये खुणे । पावविलें सामथ्यें गुणें ॥३॥

निळा म्हणे ऐसे किती । उपकार वानूं पुढतोपुढतीं ॥४॥

—-

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.