न वजों यावरी आतां कोठें – संत निळोबाराय अभंग – 1465

 

न वजों यावरी आतां कोठें । सांडुनि चरण हे गोमटे ॥१॥

जोडलें ते भाग्ययोगें । येणे काळें संतसंगें ॥२॥

दुभिन्नले वरुषोनी वरी । प्रेमअमृताच्या धारीं ॥३॥

निळा म्हणोनी सांठी । केली जिवें देउनी मिठी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.