नव्हती माझे फुकट बोल – संत निळोबाराय अभंग – 1464

 

नव्हती माझे फुकट बोल । जाणे विठ्ठल  सत्य मिथ्या ॥१॥

संतकृपेची हे जाती । ओघेंचि चालती अक्षरें ॥२॥

कैंची मती बोलावया । ठायींचि पायां विदित तें ॥३॥

निळा म्हणे बाहेरी आलें । होतें सांठविलें ह्रदयीं जें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.