गेला फिरोनिया दिवस – संत निळोबाराय अभंग – ९८१

गेला फिरोनिया दिवस – संत निळोबाराय अभंग – ९८१

गेला फिरोनिया दिवस ।
न ये घटिका लव निमिष ॥१॥
आहे तोंचि भरा हातीं ।
महा लाभाची संपत्ती ॥२॥
मागें नागवली फारें ।
गेलीं वांयां नारीनरें ॥३॥
निळा म्हणे म्हणोनि जागा ।
सांडोनी वोरबार वाउगा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गेला फिरोनिया दिवस – संत निळोबाराय अभंग – ९८१