गुंतली ते आशा । पडिली मोहजाळ फांसा ॥१॥ न देखोनियां श्रीहरी । कर्ता भोक्ता संसारीं ॥२॥ अवघीचि त्याचि सत्ता । करवी करि तो तत्वतां ॥३॥ निळा म्हणे ऐसी । नेणोनि होती कासाविसी ॥४॥