गुंतली ते आशा – संत निळोबाराय अभंग – ९८०
गुंतली ते आशा ।
पडिली मोहजाळ फांसा ॥१॥
न देखोनियां श्रीहरी ।
कर्ता भोक्ता संसारीं ॥२॥
अवघीचि त्याचि सत्ता ।
करवी करि तो तत्वतां ॥३॥
निळा म्हणे ऐसी ।
नेणोनि होती कासाविसी ॥४॥
गुंतली ते आशा ।
पडिली मोहजाळ फांसा ॥१॥
न देखोनियां श्रीहरी ।
कर्ता भोक्ता संसारीं ॥२॥
अवघीचि त्याचि सत्ता ।
करवी करि तो तत्वतां ॥३॥
निळा म्हणे ऐसी ।
नेणोनि होती कासाविसी ॥४॥