हात पाय इंद्रियें मिळोनि मेळा । चला म्हणती पाहों डोळा ॥१॥ देखणेंचि नव्हती देखती काये । अवघीयाचा देखणा डोळाचि आहे ॥२॥ आंता डोळिया डोळा पाहों म्हणे । तंव आपआपणीया न चले पाहाणें ॥३॥ निळा म्हणे ऐशिया परी । जाणों जातां जाणणेंचि हरि ॥४॥