सांगतां आतां न वाटे – संत निळोबाराय अभंग – ९७७

सांगतां आतां न वाटे – संत निळोबाराय अभंग – ९७७

सांगतां आतां न वाटे खरें ।
भोगितां बरें जाणवेल ॥१॥
तेव्हां कोणी न ये कामा ।
हिरोनी श्रमा घ्यावया ॥२॥
यमजाच होतां दंड ।
न चले खंड धन देता ॥३॥
निळा म्हणे ऐशी गती ।
होऊनि पुढती गर्भवास ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सांगतां आतां न वाटे – संत निळोबाराय अभंग – ९७७