पुण्यपावन त्यांची वाणी । जगदोध्दचरणीं प्रवर्तली ॥१॥ सव्दिवेक अमृतपूर । चालती उदगार वाचे ते ॥२॥ भगवदजन परमार्थवाणी । जे वेदीं पुराणीं बहु मान्य ॥३॥ निळा म्हणे अदभुत रस । गोड सारांश हितकर्ता ॥४॥