पिसाळलें श्वान – संत निळोबाराय अभंग – ९७३
पिसाळलें श्वान ।
डसें भलत्या वसवसून ॥१॥
नेणें आपुलें पारिखें ।
घारलें ते आपल्या दु:खें ॥२॥
सुरापानीं भुलोनि जैसा ।
भोगी आपणा आणिकासरिसा ॥३॥
निळा म्हणे तैसी परी ।
जीविता महा मुर्ख करी ॥४॥
पिसाळलें श्वान ।
डसें भलत्या वसवसून ॥१॥
नेणें आपुलें पारिखें ।
घारलें ते आपल्या दु:खें ॥२॥
सुरापानीं भुलोनि जैसा ।
भोगी आपणा आणिकासरिसा ॥३॥
निळा म्हणे तैसी परी ।
जीविता महा मुर्ख करी ॥४॥