पापें पूर्वज नरका जाती । पापेंचि बुडती धर्म सकळ ॥१॥ पापेंचि कुळ भंगा जाय । वंशासी होय अपघात ॥२॥ पापेंचि यश कीर्ति पळें । पापेंचि सोहळे दरिद्राचे ॥३॥ निळा म्हणे घडतां पापेंचि पतनीं । पडती यातनीं पूर्वजेंसी ॥४॥