पाप तया नांव परदारागमन – संत निळोबाराय अभंग – ९७१

पाप तया नांव परदारागमन – संत निळोबाराय अभंग – ९७१

पाप तया नांव परदारागमन ।
पाप तें परधन अपहार ॥१॥
पाप तेंचि निंदा परपीडा व्देष ।
पाप तेंचि उपहास पुढिलाचें ॥२॥
पाप तेंचि जीवीं विषयाची आसक्ति ।
पाप अभक्तीं कुळाचारीं ॥३॥
निळा म्हणे पाप मुख्य तेंचि साचें ।
नावडे देवाचें नाम मुखीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पाप तया नांव परदारागमन – संत निळोबाराय अभंग – ९७१