जरी झाला तपस्वी थोर ।
तरी असावें दूर परस्त्रिसी ॥१॥
गुरुनींही एकांतासी ।
न वजावें स्त्रीयांसी उपदेशा ॥२॥
वसतां एकत्र आनोविन ।
होईल जघन्या निमीषें ॥३॥
निळा म्हणे जतन करा ।
शाहाणे विचारां ऐसें आतां ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.