होईल अंगी बळ । तरी फजीत करावे ते खळ ॥१॥ जे कां करुनियां पाखांड । लटिकेंचि वाढविती बंड ॥२॥ भोंदिती भाविकां । कथुनी परमार्थ तो लटिका ॥३॥ निळा म्हणे तोंडें सांगें । तैसें नाचरोनियां अंगें ॥४॥