हिंडवितां देश – संत निळोबाराय अभंग – ९६७
हिंडवितां देश ।
नये तुटी ज्या लाभास ॥१॥
चाले सर्व घेणेंदेणें ।
कोठें कांहीं न पडे उणें ॥२॥
पारखितां भलें ।
कसींतांही उतरलें ॥३॥
निळा म्हणे निवडी नाहीं ।
एकसारिखेंचि अवघेंही ॥४॥
हिंडवितां देश ।
नये तुटी ज्या लाभास ॥१॥
चाले सर्व घेणेंदेणें ।
कोठें कांहीं न पडे उणें ॥२॥
पारखितां भलें ।
कसींतांही उतरलें ॥३॥
निळा म्हणे निवडी नाहीं ।
एकसारिखेंचि अवघेंही ॥४॥