संत निळोबाराय अभंग

वाळिलें जे पंढरिनाथें – संत निळोबाराय अभंग – ९६५

वाळिलें जे पंढरिनाथें – संत निळोबाराय अभंग – ९६५

वाळिलें जे पंढरिनाथें ।
त्याचें कोण कार्य येथें ॥१॥
घाला आपणा बाहेरीं ।
नका सांगों त्याची थोरी ॥२॥
आगम पहिला वेदांत ।
चित्त विषयापें सतत ॥३॥
धनें मानें केलें वेडें ।
सुख नेणती ते बापुडे ॥४॥
मान इच्छा चाड जीवीं ।
काय करुं ते गोसावी ॥५॥
जाती म्हणोनी आनाठाया ।
निळा दुर पासुनी तयां ॥६॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वाळिलें जे पंढरिनाथें – संत निळोबाराय अभंग – ९६५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *