म्हणोनि याचिया श्रवणें पाठें । वचनें पालटे देहबुध्दी ॥१॥ वैराग्याची राणीव जोडें । ज्ञानाचें उघडें निजमंदिर ॥२॥ नवविधांचें नाना भोग । वसविती अंग येऊनियां ॥३॥ निळा म्हणे भक्ति मुक्ति । शांति विरक्ति वरती त्या ॥४॥