म्हणोनि याचिया श्रवणें – संत निळोबाराय अभंग – ९६४
म्हणोनि याचिया श्रवणें पाठें ।
वचनें पालटे देहबुध्दी ॥१॥
वैराग्याची राणीव जोडें ।
ज्ञानाचें उघडें निजमंदिर ॥२॥
नवविधांचें नाना भोग ।
वसविती अंग येऊनियां ॥३॥
निळा म्हणे भक्ति मुक्ति ।
शांति विरक्ति वरती त्या ॥४॥