मोलें विकें स्वाभावगुणीं । येरवी तीतें न पुसे कोणी ॥१॥ हिंगा दुर्गधीची मोल । तेणेंविण तो अवघा फोल ॥२॥ भांगीं न भुलवीं भक्षिल्या । येरचि तरी तो व्यर्थचि पाला ॥३॥ निळा म्हणे तैशिया परी । देवपणेंचि देवा थोरी ॥४॥