माया म्हणजे नसतेंचि दिसें । गगनीं जैसें दोनी चांद ॥१॥ असें एक भासे आणीक । तया नांव मायीक पसारा ॥२॥ सत्यावरी न पडे दृष्टी । विकल्प परिपाठी घालितु ॥३॥ निळा म्हणे प्रत्यक्ष लपवी । लटिकेंचि रुढवी भ्रांतिजाळ ॥४॥