माया म्हणजे नसतेंचि – संत निळोबाराय अभंग – ९६०
माया म्हणजे नसतेंचि दिसें ।
गगनीं जैसें दोनी चांद ॥१॥
असें एक भासे आणीक ।
तया नांव मायीक पसारा ॥२॥
सत्यावरी न पडे दृष्टी ।
विकल्प परिपाठी घालितु ॥३॥
निळा म्हणे प्रत्यक्ष लपवी ।
लटिकेंचि रुढवी भ्रांतिजाळ ॥४॥