तोचि जाणें अंतरीचें । लटिकें साचें सर्वदृष्टा ॥१॥ कैसें चाले तयापुढें । निवडे कुडे वरावरी ॥२॥ हें तों आहे सकळां ठावें । लटिक्या भावें नपवीजे ॥३॥ निळा म्हणे अभिमान होता । ठाकीला विधाता शेष नेदी ॥४॥