तोचि जाणें अंतरीचें – संत निळोबाराय अभंग – ९५८
तोचि जाणें अंतरीचें ।
लटिकें साचें सर्वदृष्टा ॥१॥
कैसें चाले तयापुढें ।
निवडे कुडे वरावरी ॥२॥
हें तों आहे सकळां ठावें ।
लटिक्या भावें नपवीजे ॥३॥
निळा म्हणे अभिमान होता ।
ठाकीला विधाता शेष नेदी ॥४॥