योगाभ्यास साधताचि सांग । येति उपसर्ग सिध्दींचे ॥१॥ कैंचि तेथें हरीसी भेटी । विवंचना शेवटी काळाचि ॥२॥ विचारितां ज्ञान अभिमान वाढे । नसतेचि झगडे जाणिवेचे ॥३॥ निळा म्हणे जे हरिनाम जपती । मुक्तचि ते होति नि:संशये ॥४॥