योगाभ्यास साधताचि सांग – संत निळोबाराय अभंग – ९५७
योगाभ्यास साधताचि सांग ।
येति उपसर्ग सिध्दींचे ॥१॥
कैंचि तेथें हरीसी भेटी ।
विवंचना शेवटी काळाचि ॥२॥
विचारितां ज्ञान अभिमान वाढे ।
नसतेचि झगडे जाणिवेचे ॥३॥
निळा म्हणे जे हरिनाम जपती ।
मुक्तचि ते होति नि:संशये ॥४॥