संत निळोबाराय अभंग

नाही शब्दाधीन वर्म आहे – संत निळोबाराय अभंग – ९५६

नाही शब्दाधीन वर्म आहे – संत निळोबाराय अभंग – ९५६

नाही शब्दाधीन वर्म आहे दुरी ।
नव्हे तंत्रमंत्रीं अनुभव तो ॥१॥
हर्षामर्ष आंगीं आंदोलती लाटा ।
कामक्रोधे तटा सांडीयले ॥२॥
न सरें ते भक्ती विठोबाचे पाई ।
उपरती नाहीं जेथें चित्तां ॥३॥
निळा म्हणे सुख देहनिरसनें ।
येर ते वचनें व्यर्थ वाया ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाही शब्दाधीन वर्म आहे – संत निळोबाराय अभंग – ९५६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *