विंचु नांगीं विष धरी । खोसडेवरी मृत्यु त्या ॥१॥ जैसें कर्म तैसें फळ । हें तों अढळ न चुकेचि ॥२॥ चोयाकरिता तुटती हात । पावति घात जीवितेसी ॥३॥ निळा म्हणे सिनळी करिता । झुरती उभयता नाककान ॥४॥