कोण भाग्याचे ते – संत निळोबाराय अभंग – ९५३
कोण भाग्याचे ते लोक ।
केलें कौतुक तुम्हीं ज्यांचें ॥१॥
वागउनियां कडिये खांदीं ।
निजात्मपदीं स्थापियलें ॥२॥
ज्यांचिया वचनासाठीं उडी ।
घालुनी तांतडी उभें ठाकें ॥३॥
निळा म्हणे दिवस राती ।
जयांप्रती न विसंबा ॥४॥