किंचीत सुख आगळें – संत निळोबाराय अभंग – ९५१

किंचीत सुख आगळें – संत निळोबाराय अभंग – ९५१

किंचीत सुख आगळें दु:ख ।
पावती अवश्यक व्यभिचारी ॥१॥
क्षयो व्याधी भगें पडतीं ।
जगनिंदय होती हे आधीं ॥२॥
पुढें राजा दंड करी ।
सर्वस्व हरी देखतां ॥३॥
निळा म्हणे हांसती लोक ।
थुंकिती थुंक तोंडावरी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

किंचीत सुख आगळें – संत निळोबाराय अभंग – ९५१