ऐशियाचे घरीं ऐसीचि – संत निळोबाराय अभंग – ९५०
ऐशियाचे घरीं ऐसीचि मी सदा ।
न करुनी कांही धंदा सर्वहि करी ॥१॥
सदाचि निष्काम सदा मी मी सकाम ।
सद रुप नाम नूतन माझें ॥२॥
सदा नाहींपणें सदा माझें जिणें ।
सदा होणें निमणें माझा वांटा ॥३॥
निळा म्हणे ऐसें बोले मायादेवी ।
अबोलण्याची गांवीं वसोनियां ॥४॥