ऐशा सोसूनियां यातना । कां रे मना वीट नये ॥१॥ बुध्दिहीना मतिमंदा । किती आपदा उसंतिसी ॥२॥ कधीं पावेल परिपाक । बुध्दि विवेका सपर्शेल ॥३॥ निळा म्हणे रित्या मापें । विषय संकल्पें मावितोसी ॥४॥