ऐशा सोसूनियां यातना – संत निळोबाराय अभंग – ९४९
ऐशा सोसूनियां यातना ।
कां रे मना वीट नये ॥१॥
बुध्दिहीना मतिमंदा ।
किती आपदा उसंतिसी ॥२॥
कधीं पावेल परिपाक ।
बुध्दि विवेका सपर्शेल ॥३॥
निळा म्हणे रित्या मापें ।
विषय संकल्पें मावितोसी ॥४॥
ऐशा सोसूनियां यातना ।
कां रे मना वीट नये ॥१॥
बुध्दिहीना मतिमंदा ।
किती आपदा उसंतिसी ॥२॥
कधीं पावेल परिपाक ।
बुध्दि विवेका सपर्शेल ॥३॥
निळा म्हणे रित्या मापें ।
विषय संकल्पें मावितोसी ॥४॥