उत्तम अधम जया जे संगती । तैसी त्याचि मति फांकों लागें ॥१॥ सज्जना संगतीं धर्मक्रिया वाढे । पापीया आवडे पापबुध्दि ॥२॥ म्हणोनि जैसिया तैसा झाला हरी । भक्ता मित्र वैरी निंदक खळा ॥३॥ निळा म्हणे जाणे अंतरीचां भाव । तया तैसा देव फळदाता ॥४॥