उत्तम अधम जया जे – संत निळोबाराय अभंग – ९४६
उत्तम अधम जया जे संगती ।
तैसी त्याचि मति फांकों लागें ॥१॥
सज्जना संगतीं धर्मक्रिया वाढे ।
पापीया आवडे पापबुध्दि ॥२॥
म्हणोनि जैसिया तैसा झाला हरी ।
भक्ता मित्र वैरी निंदक खळा ॥३॥
निळा म्हणे जाणे अंतरीचां भाव ।
तया तैसा देव फळदाता ॥४॥