सांपडलीं संधी । त्यासी कर्मी दृढ बुध्दी ॥१॥ वेदविहित कर्म । हेंचि परमार्थाचें वर्म ॥२॥ कर्मालागीं जो तत्पर । तोचि पावे पैलपार ॥३॥ निळा म्हणे परब्रम्ह । प्राप्त होय विहित कर्म ॥४॥