सांगितली धरिती गोठी । आदर पोटीं भक्तांचा ॥१॥ तया सन्मुख झाला हरी । संसार तमारी तिमाराचा ॥२॥ निरसूनियां भ्रांतिमळ । केलें निर्मळ सहवासी ॥३॥ निळा म्हणे झाला ऋणी । चक्रपाणी त्याचाची ॥४॥