सार्थकाचा ऐसा काळ । केला अमंगळ मूढ जनीं ॥१॥ येऊनियां नरदेहासी । नेणें स्वहितासी आपुलिया ॥२॥ धिक् त्याचें झालें जिणें । विना स्मरणें श्रीहरिचिया ॥३॥ निळा म्हणे त्याची जोडी । अवघी कुळवाडी पापत्मक ॥४॥